Wed. Sep 23rd, 2020

हरभजनच्या बॉलिंग एक्शनची नक्कल करतानाचा विराटचा व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे आपल्या हटके बॉलिंग एक्शनसाठी ओळखले जातात. यामध्ये मुथय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा आणि भारताच्या हरभजन सिंह याचा समावेश होतो.

हरभजन सिंह आपल्या हटके बॉलिंगसाठी ओळखला जातो. त्याची बॉलिंग एक्शन विचित्र आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा हरभजनच्या बॉलिंग एक्शनची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

स्टार स्पोर्ट्सने हरभजनाच्या बॉलिंगची नक्कल करतानाचा विराटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी २० मॅचआधी ही सर्व धमाल पाहायला मिळाली. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत असताना विराट आणि हरभजन यांच्यात मस्करी सुरु होती.

विराटने केलेली बॉलिंग एक्शनची नक्कल पाहून हरभजनलाही हसू आवरले नाही.

दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव केला.

या विजयामुळे टीम इंडियाने ३ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिली टी-२० पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला.

त्यामुळे श्रीलंकेवर मालिका पराभव टाळण्यासाठी १० तारखेला होणारा सामना वाचवण्याचे आव्हान असणार आहे.

तर टीम इंडिया तिसरी टी-२० जिंकून मालिका जिंकण्याचा मानस असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *