Sun. Oct 17th, 2021

चेतन साकारियाच्या संघर्षाबद्दल सेहवागचं भावनिक ट्विट

डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून स्वप्नवत पदार्पण केले. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या या सामन्यात साकारियाने ४ षटकात ३१ धावा देऊन ३ गडी बाद केले. केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि झाय रिचर्ड्सन या फलंदाजांना साकारियाने तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसोबत त्याने मैदानावर निकोलस पूरनचा भन्नाट झेलही टिपला. त्यामुळे चेतन साकारिया सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर साकारियाच्या संघर्षाची कहाणी शेअर केली. साकारियाच्या आईची मुलाखत शेअर करत सेहवाग म्हणाला, ”चेतन साकारियाच्या भावाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यावेळी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता. १० दिवस त्याच्या आई वडिलांनी हे वृत्त त्याच्यापासून लपवून ठेवले. क्रिकेट हे या युवा आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे आहे. आयपीएल खरोखरच भारतीयांचे स्वप्न पूर्ण करीत आहे आणि काही कथा या विलक्षण असल्याच्या समोर येतात.”
सौराष्ट्राकडून सय्यद मुश्ताक अली करंडक खेळत असताना जानेवारीत चेतन साकरियाच्या छोट्या भावाने आत्महत्या केली. तर, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएलच्या लिलावात साकारियाला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी रुपये मोजून खरेदी केले. तो गेल्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा (आरसीबी) नेट बॉलर होता. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स क्रिकेटचा संचालक कुमार संगकारानेही साकारियाचे खूप कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *