व्होडका बनवणार हँड सॅनिटायजर्स

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार हात धुणं गरजेचं आहे. मात्र त्यामुळे हँड सॅनिटायजरचा खप एवढा वाढला की बाजारात हँड सॅनिटायजरचा तुटवडा भासू लागला आहे. त्यावर आता व्होडका ब्रँडने सॅनिटायजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या आठवड्यात व्होडकातर्फे २४ टन हँड सॅनिटायजर्स तयार करण्यात येणार आहे. यादर्भात कंपनीने रविवारी घोषणा केली. सध्या याचं टेस्टिंग सुरू आहे. उत्पादन तयार करणं, पॅकेजिंग, पुरवठा यांचा अभ्यास सुरू आहे. २४ टन सॅनिटायजर तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची व्यवस्था सध्या सुरू आहे.
गरजू लोकांना ही सॅनिटायजर्स मोफत मिळणार असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. ज्या लोकांना सॅनिटायजरची गरज सर्वधिक आहे, त्यांना विनामूल्य सॅनिटायजर्स पुरवले जातील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. कंपनीने व्होडका ही दारू हँड सॅनिटायजेशनसाठी जे वापरत आहेत, त्यांनी ती तशी वापरू नये, अशी सूचना दिली आहे