Fri. Jan 22nd, 2021

Mumbai: मालाडमध्ये भिंत कोसळली 18 ठार तर 75 जखमी

मुंबईतील मालाड येथे भिंत कोसळून 18 लोक ठार तर 13 जण ठार झाले आहेत. मालाडमधील कुरार या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे

मुंबईतील मालाड येथे भिंत कोसळून 18 लोक ठार तर 75 जखमी ठार झाले आहेत. मालाडमधील कुरार या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. भिंत कोसळल्यानंतर याठिकाणी NDRF ची टीम आणि अग्नीशमन दलाकडून बचावाचे कार्य सुरु आहे. याठिकाणी आता ढिगारा उपसून मदत करण्याचे काम सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

मालाडमधील पिंपरीपाडा या परीसरात असणाऱ्या झोपड्यांवर मोठी भिंत कोसळली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या गंभीर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. त्यांपैकी 4 जणांची प्रकृती चिंताग्रस्त आहे.

एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली अडकली असल्याचे आढळून आले आहे. तिला सुखरुपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

घटनास्थळी अग्निशमन आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.तसेच या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत.

त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील जखमींना शताब्दी रुग्णालय आणि आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *