Sat. Jul 4th, 2020

वॉटर कप 2018च्या बक्षिस समारंभात राजकीय फटकेबाजी…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे 

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपचा बक्षिस समारंभाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. एकीकडे आमिर खानच्या कामाचं कौतुक केले तर दुस-या बाजूला सरकारवर मात्र टीका केली.

आमिर खानने अशक्य ते शक्य करून दाखवले. कुठलाही पुरस्कार अामीर खान घेत नाहीत मात्र मॅगेसेसिस पुरस्कार मात्र नक्की घ्या, असंही राज यावेळी म्हणालेत.

राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी राज यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी केली, त्यावर राज यांनी मी नक्कीच येईन असं आश्वासन दिलं.

या कार्यक्रमात उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय टीकास्त्र सुद्धा दिसून आले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरेंसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमातील भाषणात अभिनेता आमिर खानने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प फक्त आपला नव्हे, तर राज्यातील 11 कोटी जनतेचा आहे असे म्हटले आहे. सोबतच, हे काम सर्वांचे असून सर्वांनी केल्यानंतरच यशस्वी होईल असेही आमिर खान म्हणाला. 

 
 

राज ठाकरेंचं भाषण –

 • पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे
 • आमिर खानच्या कामाचं केलं कौतुक
 • 60 वर्षात पाणलोटाचं काहीच काम झालं नाही
 • सरकारच्या दुर्लक्षामुळे पाणी पातळी कमी झाली
 • पाणी ही अत्यंत महत्वाचं आहे.
 • पक्ष जात धर्म याच्यापलीकडे पाणी आहे असं म्हणताना त्याच बरोबर काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही सरकारचे प्रतिनीधी इथे हजर आहेत.
 • मग 60 वर्षात पाणलोटाचा पैसा गेला कुठे असा सवाल विचारत, जर 60 वर्षात पाणलोट विभागात पैश्याचा योग्य वापर केला असता, तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती.

त्यावर अजित पवारांचा टोला – 

 • काही लोक फक्त बोलतात करत काहीच नाहीत अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार – 

 • राज ठाकरेंचा समाचार घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुद्धा समाचार घेतला.
 • राजकीय नेते कधी एक होणार नाहीत फक्त भांडत राहणार याची जाणीव आमिर खान यांना होती त्यामुळेच त्यांनी पाणी फाउंडेशन स्थापित करून स्वतः काही करण्याचा निर्णय घेतला आणि परिणाम सर्वांसमोर आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

वॉटर कप 2018 पुरस्कार विजेते – 

 • सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी गावाला पहिले पुरस्कार जाहीर झाले. 
 • पुरस्काराची रक्कम 75 लाख आणि मानचिन्ह
 • सोबतच, राज्य सरकारकडून अतिरिक्त 25 लाखांचे बक्षीस 
 • साताऱ्यातील मांडवी गावाला दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • या दोन्ही गावांना पुरस्काराची रक्कम 25-25 लाख अशी विभागून दिली जाणार आहे.
 • यांनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या राज्य शासनाकडून अतिरिक्त 15 लाख रुपये विभागून दिले जातील.
 • बीड जिल्ह्यातील आनंदवाडी गावाला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • सोबतच नागपूर जिल्ह्यातील उमठा गावाला सुद्धा तिसरे पुरस्कार देण्यात आले आहे.
 • या दोन्ही गावांना तिसरे पुरस्कार विभागून दिले जाणार आहे.
 • राज्य सरकारकडून त्यांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *