Mon. Dec 16th, 2019

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

पिंपरी :  नेहरूनगरमधील जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. जलवाहिनी फुटल्याने पाणी रसत्यावर आले आहे. रसत्यावर पाणी आल्याने वाटसरुंना मोठी कसरत करावी लागत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अद्याप देखील पालिकेचे कर्मचारी आलेले नाहीत.   

दरम्यान, शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना याचा नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *