Tue. Nov 24th, 2020

धक्कादायक! कुणी पाणी मागितलं तर त्याचा जीव घेणार का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पाणी म्हणजे जीवन मात्र हे पाणी सध्या जीवघेणं ठरलं आहे. कारण याच पाण्यासाठी एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. फक्त दुष्काळग्रस्त भागातच नव्हे, तर मुंबईतही पाण्यासाठी हाणामारी होत आहे आणि अशाच हाणामारीनं एकाचा बळी घेतला.

 

मुंबईतल्या चारकोपमध्ये पिण्याचं पाणी मागितल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी मारहाण केली. त्यात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संजय गंगातिवरे असं या मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली. तर एक जण फरार झाला.

 

कलावती मोहिते, तेजस्विनी मोहिते, सुनील मोहिते, अजित मोहिते आणि मुकूंद गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. विशाल मोहिते हा फरार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *