Mon. Jan 25th, 2021

EVMविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढणार – विरोधक

काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक ठेपली असताना विरोधकांनी EVMविरोधात पत्रकार परिषद घेत बहिष्कार टाकला आहे. या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक विरोधकांनी उपस्थितीत लावली. EVM वर विश्वास नसून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

आमचा EVMवर विश्वास नाही –

आज विरोधकांनी EVMविरोधात पत्रकार परिषद घेत बहिष्कार टाकला आहे.

यामध्ये भाजपा, शिवसेनेने सुद्धा एकत्र यावं असे राज ठाकरे म्हणाले.

अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयानंतर संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते.

प्रगत देशामध्ये EVMचा वापर होत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

मतदारांना कळलं पाहिजे त्यांनी कोणाला मतदान केलं आहे.

या लढाईत सगळ्यांनी सहभागी व्हावं तसेच EVM वर आमचा विश्वास नसल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल असे विरोधकांनी सांगितले आहे.

बॅलेट पेपरसंदर्भात घरोघरी अर्ज वाटप केला जाणार आहे.

21 ऑगस्टाला EVMविरोधात सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *