Fri. Apr 16th, 2021

गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो – मुख्यमंत्री

गडचिरोली येथील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला असून यामध्ये सी-60 पथकाचे 15 जवान शहीद झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. आम्ही शहीद झालेल्या कुटुंबियांसोबत आहोत. तसेच हा धोका संपवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करू आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे मुख्यमंत्र्यांचे ट्विट ?

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात सी-60 पथकाचे 15 जवान शहीद झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

आम्ही शहीग झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत असून धोका संपवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न सुरू आहे.

तसेच त्यांना या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला आहे.

 

नेमकं काय घडलं ?

आजच मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली.

त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला.

त्यात १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.

वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरु आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *