आघाडीत मनसेला स्थान नाही – शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि सेनेत विरोधकांची मेगाभरती सुरू आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज पत्रकार परिषदेत भाजपा आणि सेनेवर प्रचंड टीका केली आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
मेगाभरती 1957 आणि 1962 साली सुद्धा करण्यात आली होती.
मात्र ज्या वेगाने मेगाभरती होत आहे त्याप्रमाणे होत नसल्याचे म्हटलं आहे.
ईडीची नोटीस बजावून माझ्या काही सहकार्यांना धमकी देत असल्याचे शरद पवार म्हणाले आहे.
उदयनराजे यांनी केलेल्या आरोपावर काही बोलणार नसून 15 वर्षानंतर हे आरोप करणे सुचले का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागांवर लढणार उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देणार.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे बाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटलं आहे.