Jaimaharashtra news

या वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. १४ जून २०२० मध्ये ३४ वर्षीय सुशांतसिंह राजपूत यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर बरेच आरोप-प्रत्यारोप तसेच राजकारण झाले होते. मुंबई पोलिस व्यतिरिक्त सुशांतच्या मृत्यूचा तपास बिहार पोलिस आणि नंतर सीबीआयनेही केला होता. ईडी आणि एनसीबीने देखील या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. पहिला स्मृतीदिनानिमित्त जवळच्या मित्रांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या नावाने वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर त्यांचे जीवन, त्यांचा अनोखा प्रवास आणि त्याच्या सर्व कामगिरीबाबतची माहिती असणार आहे. या संकेतस्थळाला www.ImmortalSushant.com असे नाव देण्यात आले आहे.

या वेबसाईटवर सुशांत विषयी भरपूर माहिती उपलब्ध असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना ही वेबसाइट आवडेल. सुशांतसाठी ज्या काही मोहीमा सामाजिक माध्यमांमध्ये राबवल्या गेल्या त्या सगळ्या येथे दर्शविल्या आहेत. एक संपूर्ण फोटो गॅलरी त्याच्या चित्रांना समर्पित आहे. त्याच्याकडे १५० स्वप्नांची यादी होती. त्याने पूर्ण केलेले प्रत्येक स्वप्नं ‘त्याची स्वप्ने’ विभागात नमूद केले आहेत. इतकेच नाही तर चाहत्यांना त्याचे व्हिडिओ, त्याच्या मुलाखती, त्याचे चित्रपट आणि त्याच्या चित्रपटामधील गाणी देखील या वेबसाईटवर मिळतील. या वेबसाईटवर जाऊन सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास नक्की पाहा.

Exit mobile version