विंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा मुंबईच्या रुग्णालयात दाखल

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना होत असल्याने ब्रायन लाराला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे. ब्रायन लारावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटूला रुग्णालयात दाखल केले आहे.
छातीत दुख:त असल्यामुळे ब्रायन लाराला मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे.
त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वेस्ट इंडिजच्या विश्वचषकाच्या निमित्ताने भारतात आल्याचे समजते आहे.
एका स्पोर्टस वाहिनीवर ब्रायन लारा क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम करत आहे.