Tue. Oct 27th, 2020

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शनिवारी ८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून ते – रविवार पहाटेपर्यंत एकूण ८ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेट स्थानकावरुन विरार आणि बोरिवलीच्या दिशेने शनिवारी १० वाजून १ मिनिटांनंतर रेल्वे धावणार नाहीत.

…यामुळे धावणार नाही रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड-ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशन दरम्यान शनिवारी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

चर्नी रोड-ग्रॅण्ट रोड या स्थानकादरम्यान  फेररे उड्डाणपुलावरील गर्डर उभारण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुन दिली आहे.

शनिवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांपासून ते  रविवारी  सकाळी ६ पर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. याब्लॉकमुळे यावेळेत रेल्वे सेवा प्रभावित होणार आहेत.

म्हणजेच यावेळेत चर्चगेट- मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रेल्वे धावणार नाहीत.

या मेगाब्लॉकमुळे विरारवरुन येणाऱ्या रेल्वे मुंबई सेंट्रलपर्यंतच धावतील. यानंतर त्याच रेल्वे मुंबई सेंट्रलवरुन विरारच्या दिशेने रवाना होतील.

मेगाब्लॉकचा परिणाम

या विशेष मेगाब्लॉकमुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या विशेष मेगाब्लॉकमुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वे धावणार नाहीत.

चर्चगेट आणि विरारवरुन सुटणारी शेवटची रेल्वे

शनिवारी (८ फेब्रुवारी ) चर्चगेटवरुन बोरिवलीसाठी शेवटची धिमी लोकल रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी सुटणार आहे. तर चर्चगेटवरुन विरारसाठीची जलद लोकल १० वाजून १ सुटेल.

तसेच बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने शेवटची लोकल ९ वाजून ०३ मिनिटांनी सुटेल.  तसेच विरारहून चर्चगेटसाठीची अखेरची जलद लोकल  रात्री ८ वाजून  ५१ मिनिटांनी सुटणार आहे.

गर्डर उभारण्यासाठीच्या कामासाठी शनिवारी रात्री  ११ वाजून १५ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर रविवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत हे काम चालणार आहे.

बेस्ट प्रवाशांच्या मदतीला

या ८ तासांच्या विशेष मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट धावून आली आहे. बेस्ट या ८ तासांच्या काळात विशेष बस सोडणार आहे. याबाबातचे ट्विट बेस्टच्या अधिकृत ट्विटरवरुन करण्यात आले आहे.

या ब्लॉक दरम्यान बेस्टतर्फे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान विशेष बससेवा चालवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *