थर्टी फस्ट आणि न्यू इअरसाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष रेल्वे

नववर्षासाठी पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे चालवणार आहे. याबद्दलची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे दिली आहे.
३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे एकूण ८ रेल्वे चालवणार आहे.
विरार ते चर्चगेट दरम्यान 4 आणि चर्चगेट ते विरार दरम्यान 4 अशा एकूण 8 लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेने स्टेशननिहाय या विशेष रेल्वे फेऱ्यांचे वेळापत्रक देखील जारी केले आहे.
न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणावर मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाला येत असतात.
या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये , तसेच प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.