Fri. Sep 25th, 2020

दहावी पास तरुणांसाठी पश्चिम रेल्वेत 3553 जागांची भरती

पश्चिम रेल्वेत दहावी पास तरुणांसाठी विविध पदासांठी पदभरती केली जाणार आहे. या संदर्भातील जाहीरात पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केली आहे.

दहावी पास तरुण विविध पदासांठी अर्ज करु शकतात. विविध पदांसाठी एकूण 3553 जागांसाठी ही भरती असणार आहे.

या विविध पदांसाठी मंगळवार म्हणजेच आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. 6 फेब्रुवारी ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे.

पश्चिम रेल्वेच्या https://rrc-wr.com/ या वेबसाईटवर ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये पेंटर, इलेक्ट्रेशियन, प्लंबर यासारख्या अनेक पदांसाठी ही पदभरती आहे.

या विविध पदांसाठी अर्जदाराचे किमान वय 15 ठेवण्यात आले आहे. तर 24 वर्षांपर्यंतचे वय असणारे तरुण अर्ज करु शकतात. तसेच आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना वयामध्ये सुट आहे.

विविध पदांसाठी अर्ज करणारा तरुण हा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 55 ट्क्क्यांसह दहावी उत्तीर्ण हवा. तसेच अर्जदार आयटीआय उत्तीर्ण हवा.

या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना 100 रुपये प्रवशे शुल्क असणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना आणि महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार आहे.

त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

जाहीरातीसाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *