पंतप्रधानांच्या १५ लाखांचं काय झालं? – नितीन राऊत

आज पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे. यावेळी सभागृहात चर्चा होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ लाखांचे काय झाले? असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. नितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला.
निनित राऊतांनी केलेल्या विधानवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कधीही न बोलले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. तसेच नितीन राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी, फडणवीसांनी केली आहे तर पंतप्रधानांबद्दलचे हे वक्तव्य चुकीचे असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नितीन राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान असे कधीच बोलले नाही. यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करत काही वाक्ये बोलली. यावर फडणवीस संतापले असून पंतप्रधानांची नक्कल करणे चुकीचे असून भास्करांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.