Thu. Dec 3rd, 2020

उत्तर भारतातील लोहरी सणाची काय आहे कथा?

लोहरी हा सण उत्तर भारतमधील प्रसिद्ध सण आहे. हा सण मुख्यत: पंजाब, हरियाणा या ठिकाणी मोठ्या थाटाने साजरा करतातच आणि याशिवाय भारतात वेगवेगळ्या भागात हा सण साजरा करतात. हा सण काहीसा होळी सारखा वाटत असला, तरी लोहरी मकर संक्रांती आणि तामिळ सण पोंगल या सणांच्या आधी येतो. पंजाबी लोकांसाठी हा सण फार महत्वाचा असतो.

लोहरी सणाच्या 20 ते 25 दिवसांपूर्वी छोटी मुलं आणि मुली लोकगीत गाऊन लाकडं गोळा करतात. त्यानंतर या सणाच्या दिवशी कुटुंबातील आणि आजूबाजूला राहणारे लोक मिळून लाकडं पेटवतात. अग्निभोवती रिंगण करून गाणी गातात, नाचतात.

ज्या घरी नवीन विवाह झाला असेल त्यांना अनेक लोक या दिवशी शुभेच्छा देतात.

नववधूच्या घरातून लोहरीच्या दिवशी अनेक भेटवस्तू दिल्या जातात.

लोहरी या सणाच्या दिवशी अग्निची पूजा करून अग्नीमध्ये लाह्या, शेंगदाणे, मके अग्निला अर्पण करतात.

त्यानंतर प्रसाद म्हणून लाह्या, सुका मेवा, मक्याची रेवडी, शेंगदाणे वाटतात. गजक, रेवडी, शेंगदाणा, तीळ-गूळचे लाडू, मक्याची भाकरी, सरसोंचं साग असे विशेष खाद्यपदार्थ बनवतात.

लोहरी या सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी :

या समाशी संबंधित अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

आख्यायिका 1-

या सणासंदर्भात एक दंतकथा प्रसिद्ध आहे.

दक्ष प्रजापतीची कन्या सती हिने वडिलांनी भगवान शंकरांचा अपमान केल्यानं यज्ञकुंडात उडी टाकून प्राणत्याग केले होते.

लोहरी सण हा त्याच्याशी संबंधित आहे.

आख्यायिका 2-

सुंदरी आणि मुंदरी नावाच्या दोन अनाथ मुली होत्या.

या मुली त्यांच्या काकाकडे राहत होत्या.

या मुलींचा काका त्यांचं विधीपूर्वक लग्न न लावता एका राजाला या मुली भेट म्हणून देणार होता.

त्याचवेळी दुल्ला भट्टी नावाच्या एका प्रसिद्ध डाकूने या मुलींना पळवून नेलं.

जंगलातच लाकडं पेटवून विधीनुसार या मुलींचं लग्न चांगल्या मुलांशी लावून दिलं.

स्वतः दुल्ला भट्टीनेच या मुलींचं कन्यादान केलं. त्यांना भेट म्हणून त्यांच्या झोळीत साखर ठेवून त्यांना निरोप दिला.

त्या स्मरणार्थ लोहरी सण साजरा होतो.

आख्यायिका 3-

संत कबीर यांच्या पत्नी लाई यांच्या आठवणीत देखील लोहरी साजरा करतात.

त्यामुळे या सणाला लाई देखील म्हणतात.

हा सणाला पूर्ण उत्तर भारतात मोठ्या थाटामाठात साजरा करतात. हा उत्सव इराणमध्ये देखील साजरा करतात. इराणमध्ये हा सण प्राचीन उत्सव असल्याचं मानतात. हा सण भारतातील प्राचीनतम सिंधू संस्कृतीतून निर्माण झालेला सण असल्याचं सांगण्यात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *