Tue. Oct 19th, 2021

नाशिककरांची झोप उडवणारा व्हॉट्सॲप हॅकर सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

व्हॉटसॲप हॅक करुन नाशिककरांची झोप उडवणाऱ्या हॅकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिक सायबर पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला राजस्थानमधून ताब्यात घेतलं. त्याला पकडण्यासाठी परराज्यातल्या एका महिलेच्या हॅक अकाऊंटची मदत घेण्यात आली होती.

 

28 जूनला नाशिककरांची झोप उडाली होती. कारण काही डॉक्टर, सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांचे व्हॉट्स ॲप हॅक झाल्याचं उघड झालं. वन टाईम पासवर्ड अर्थातच ओटीपीच्या सहाय्यानं हे व्हॉट्स ॲप हॅक करण्यात आले होते.

 

सायबर पोलीस स्टेशनमध्ये नाशिकरांची रिघ लागल्यानंतर मास हॅकिंगचा हा प्रकार समोर आला होता. तब्बल तीन दिवस संशयित पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी हॅकरच्या लोकेशनचा सतत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर शनिवारी संध्याकाळी हॅकरला राजस्थानातून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *