Tue. Oct 19th, 2021

व्हॉट्स अॅप ग्रुपमुळे वाचले चौघांचे प्राण

जय महाराष्ट्र न्यूज, खोपोली

 

सोशल मिडीयाच्या वापराबाबत अनेक समज तसंच गैरसमज समाजामध्ये आहेत. या माध्यमाचा जर चांगल्या करीता वापर झाला तर अनेकांचे प्राण सुध्दा वाचविता

येतात.

 

असाच एक प्रत्यय खोपोलीमध्ये आला. महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी गुरु साठविलकर यांनी तयार केलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमुळे चौघांचे

प्राण वाचले.

 

मुंबईतील चार युवक पर्यटनासाठी लोणावळा येथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांची भरधाव वेगातील स्वीफ्ट कार खोपोली जवळच्या शिळफाटा येथे एका एस.टी.

बसला मागून जोरदार आदळली.

 

झालेल्या भीषण अपघातामध्ये कारने पेट घेतला. या अपघाताचा मेसेज मदतीच्या ग्रुपवरती गेला आणि काही वेळातच ही टीम घटनास्थळी दाखल झाली. कार पेटत

असतानाही कोणताही विचार न करता या ग्रुपमधील स्वयंसेवकांनी अपघातग्रस्त चौघांना गाडीबाहेर काढले.

 

इतकेच नाही तर त्यांना योग्य वेळी उपचारांकरीता दाखल केल्यानं या भीषण अपघातातून त्यांचे प्राणही वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *