Mon. Jan 18th, 2021

मुंबईकरांची बेस्ट आता नव्या रुपात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईची लाल परी अर्थात बेस्ट बस आता कात टाकणार आहे. बेस्टची लाल डब्बा ही ओळख पुसण्यासाठी आता बेस्टचा रंग बदलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

 

बेस्ट बसच्या लाल रंगाची जागा आता पांढऱ्या रंगानं घेतली. हा नवा लूक मुंबईकर प्रवाशांच्या किती पसंतीस उतरणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

येत्या काही दिवसांत ही पांढऱ्या रंगातील बेस्ट बस प्रायोगिक तत्वावर रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे. बेस्टच्या या नव्या लूकमध्ये केवळ तिचा रंग बदलण्यात आला. बसमध्ये कोणतेही अंतर्गत बदल करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *