Mon. Jan 24th, 2022

का नाही मिळाली सीताराम कुंटेंना मदुतवाढ?

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांची मुख्यसचिव पदी निवड झाली आहे.

सीताराम कुंटे यांना मुदतवाढ मिळण्याबाबत अनेक अडचणी येत होत्या. केवळ राज्य सरकारने सीताराम कुंटे यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवण्यात आला. मात्र केंद्राने त्यांचा ३ महिने सेवावाढ करण्याचा निर्णय फेटाळला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआय चौकशी निमित्ताने सीताराम कुंटेंना समन्स बजावण्यात आले होते. तसेच कार्यकाळ संपल्यानंतर ३ महिने मुदतवाढ मिळवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीचे समर्थन मिळवण्यात सीताराम कुंटे अपयशी ठरले.

केवळ मुख्यमंत्र्यांचा कल सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्याकडे होता, मात्र पवारांचा सीताराम कुंटे यांना ३ महिन्यांचा मुदतवाढ देण्याला नकार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा कल सुजाता सौनिक यांना मुख्यसचिव बनवण्याकडे होता. त्यामुळे सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना आणखी ३ महिने सेवावाढ करण्याबाबत पवारांचा सकारात्मक कल नव्हता.

सीताराम कुंटे यांचा आज राज्याच्या मुख्यसचिव पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी देबाशिष चक्रवर्ती यांची वर्णी लागली आहे. मात्र देबाशिष चक्रवर्ती यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत राहणार असून देबाशिष चक्रवर्ती यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुजाता सौनिक यांची मुख्यसचिव पदी वर्णी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *