Sat. Apr 17th, 2021

#HindiDiwas कशी ठरली हिंदी भारताची प्रमुख भाषा? जाणून घ्या

देशात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलेज, युनिर्व्हसिटी आणि काही ऑफिसांमध्ये आगळे-वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतात सर्वात जास्त हिंदी भाषेत संभाषण केले जाते. मात्र भारतात विविध भाषा असताना हिंदी भाषेला भारताची मुख्य भाषा म्हणून निवडण्यात आले ? असा प्रश्न बहुतेकांना उपस्थित होतो.

स्वातंत्र्यानंतर हिंदीला मुख्य भाषा म्हणून जाहीर करण्याचा निर्णय –

1947 साली भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र मिळाल्यानंतर विविध भाषिकांनी राष्ट्रभाषा निवडण्याचा प्रश्न उपस्थित केला.

14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदी भाषेला मुख्य भाषा म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर भारतात इंग्रजीला हिंदीनंतर दुसरी भाषा म्हणून निवडण्यात आले.

मात्र हिंदी भाषेला मुख्य भाषा म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेताना प्रचंड विरोध करण्यात आला होता.

अनेक ज्येष्ठ समर्थकांनी हिंदीला  मुख्य भाषेचा दर्जा मिळण्याकरीता रॅली काढण्यात आली होती.

व्यौहार राजेंद्र सिन्हा, हजारी प्रसाद द्विवेदी, काका कालेलकर, मैथली शरण गुप्त आणि सेठ गोविंद दास यांना संसदेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला.

व्यौहार राजेंद्र सिन्हा यांच्या 50 व्या जन्मदिवशी (14 सप्टेंबर 1949) संविधान सभेने हिंदीला मुख्य भाषा म्हणून घोषित केले.

त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानात समावेश करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *