Tue. Jul 7th, 2020

आज नागपंचमी आहे विशेष, कारण 20 वर्षांनी आलाय अद्भूत योग!

श्रावण महिन्यात विविध सण आणि उत्सवांना सुरुवात होते. त्यांपैकी आजचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी ‘नाग पंचमी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा केली जाते.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्त्वाचा सण असतो.

या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. नागाच्या लहान मूर्ती आणून त्या पूजल्या जातात.

अद्भूत योग!

यंदा नागपंचमी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आली आहे.

हा एक विलक्षण योग मानला जातो.

तब्बल 20 वर्षांनी हा योग आला आहे.

यापूर्वी 1999 साली असा योग आला होता.

श्रावण सोमवार हा महादेव शंकराच्या पुजेचा वार असतो.

नाग हे शिवशंकराचं आभूषण आहेत.

त्यामुळे श्रावणातल्या सोमवारी नाग पंचमी निमित्त नागाची पूजा ही विशेष फलदायी मानली जाते.

 

कशी करतात नागपंचमीची पूजा?

नागपंचमीला सकाळी लवकर उठून नित्यकर्मं आटोपली जातात.

स्त्रियांनी या दिवशी नवे अलंकार आणि वस्त्रं परिधान करायची असतात.

एका पाटावर हळद-चंदनाने नाग नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रं काढली जातात.

त्यांची पूजा केली जाते.

त्यांना दूध, लाह्या वाहिल्या जातात.

दूर्वा वाहून त्यांची पूजा केली जाते.

दूध, साखरेबरोबरच उकडीच्या पुरणाचे दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

गव्हाची खीर आणि पुरण, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाचे दिवे बनवले जातात.

 

नागपंचमीला पुढील नियमांचं पालन केलं जातं

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरणं, कापणं, तळणं या गोष्टी टाळल्या जातात.

चुलीवर तवा ठेवत नाहीत.

शेतकरी या दिवशी जमीन खणू नाहीत किंवा नांगरही चालवत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *