Mon. Apr 19th, 2021

यासाठी संक्रांतीला परिधान करतात काळी वस्त्रं

मकर संक्रात हा इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण. पुरणपोळ्या, तीळगुळ हा या सणाचा खास बेत असतो. हा सण स्रियांच्या लाडक्या सणांपैकी एक. या दिवशी त्यांना नवी खरेदी करायची संधी मिळते, नवे कपडे परिधान करायला मिळतात. मात्र या सणाच्या दिवशी नेसण्यात येणाऱ्या वस्त्रांमध्ये एक गोष्ट मात्र वेगळी असते, जी इतर कुठल्याच सणात करत नाहीत. ती म्हणजे काळी वस्त्रं परिधान करणं. या दिवशी अगदी सोसायटीच्या हळदीकुंकवालाही बायका काळी साडीच नेसतात. सिरिअलमधील आवडत्या नायिकाही काळ्या साडीत दिसतात. पण अशी काळी साडी नेसण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

खरंतर हिंदू संस्कृतीत काळा रंग हा अशुभ मानला जातो.सण समारंभात काळ्या रंगाचे कपडे घालू नये, असं नेहमीच सांगण्यात येतं. मात्र संक्रातीला बायका आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या नेसतात. जाणून घेऊया संक्रांतीला काळी वस्त्रं नेसण्यामागचं कारण

काळी वस्त्रं नेसण्यामागचं खरं कारण

मकर संक्रात हा सण दर वर्षी जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला येतो.
मराठी महिन्यानुसार पौष महिन्याच संक्रांत येते.
पौष महिना हा थंडीचा शेवटचा महिना असतो.
या महिन्यात थंडी जास्त असते.
मकर संक्रात ही उत्तरायणात येते. सूर्य उत्तरेकडे मार्गाक्रमण करू लागतो.
तेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत होय.
या दिवसांपासून थंडी कमी होऊन उन्हाळ्याची सुरूवात होते.
अशावेळी थंडीपासून बचावासाठी काळ्या रंगाचे सुती कपडे वापरले जातात.
कारण काळ्या रंगात उष्णता अधिक शोषून घेण्याची क्षमता जास्त असते.
त्यामुळे थंडीपासूव बचाव होण्यास मदत होते.


सुगड पुजन

संक्रातीची सुरूवात बायका सुगड पुजून करतात.

या दिवसात शेतात मिळणारे हरभरे, ऊस,गहू या गोष्टी एकत्र करून ती सुगड्यांमध्ये ( छोटी काळी मडकी) भरून देवाला अर्पण केली जातात.

याचाही संबंध भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीशी आहे. पौषाच्या काळात शेतामध्ये असणाऱ्या वस्तूंचाच हा नैवेद्य असतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *