Tue. Apr 20th, 2021

राज ठाकरे आणि शरद पवारांच्या पाठोपाठ सभा कशा होतात?- विनोद तावडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात सभा घेत असून त्यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवारांच्या खर्चात दाखवायचा असे पत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते. सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थापा मारल्या हे मोजा असं राज ठाकरे यांनी सोलापूरमधील सभेत म्हटलं. विनोद तावडे यांनी यावर प्रत्युत्तर दिले असून आम्ही फक्त सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या खात्यातून जाणार आहे असे विचारले होते. तसेच राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकाच ठिकाणी सभा कशा होतात ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाले विनोद तावडे ?

राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली.

तसेच सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थापा मारल्या हे मोजा असेही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मात्र आम्ही फक्त सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या खात्यातून जाणार आहे असा प्रश्न उपस्थित विनोद तावडे यांनी उपस्थित केला होता.

त्याचबरोबर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकाच ठिकाणी पाठोपाठ सभा कशा होता ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याकाळात राज ठाकरे यांच्या स्क्रिप्ट तर लिहीतात का ? असाही टोला विनोद तावडे यांनी लगावला.

तसेच राज ठाकरे हे कोणत्या स्टार प्रचार आहेत याचही उत्तर त्यांनी द्यावं असं विनोद तावडे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *