Tue. Oct 27th, 2020

पुण्यात पत्नीची पतीला गरम कुकरनं मारहाण

पुण्यात पत्नीने पोटगीसाठी पतीला गरम कुकरनं मारहाण केली आहे.

या प्रकरणी पत्नीला कोर्टाने हिंसाचार न करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी दिले आहेत.

  • पत्नीकडून पतीला मानसिक व शारीरिक त्रास
  • या प्रकरणातील पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगीसाठी दावा दाखल केला होता. मात्र पतीच पत्नीची देखभाल करत असल्याने कोर्टाने पोटगीची रक्कम दैनंदिन खर्चात विलीन केली होती.
  • पतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. हितेश सोनार आणि अॅड. नीलेश वाघमोडे यांच्यामार्फत तो दावा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज केला होता.
  • पतीने केलेल्या अर्जाचा राग आल्याने तिने पतीला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली होती.
  • यानंतरच्या काळात त्यांच्यात वारंवार वाद होत होते.यातूनचं पत्नीने गरम कुकर पतीच्या डोक्‍यात मारण्याचा प्रयत्न केला.
  • पतीने प्रसंगावधान दाखवून त्याने बचावाचा प्रयत्न केला.कुकर गरम असल्याने त्याचा हाताला दुखापत झाली होती. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता.
  • कौटुंबिक हिंसाचाराचा हा प्रकार गंभीर आहे. कायद्याचा दुरुपयोग करून महिलांद्वारे पतीचा छळ केला जावू नये त्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, असे मत अॅड. ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *