Tue. Oct 20th, 2020

शहीद मेजर कौतुभ राणेंच्या पत्नी कनिका लवकरच होणार सैन्यात दाखल!

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका राणे सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा पास केली. मेजर कौस्तुभ यांच्या हौतात्म्याला एक वर्षही अद्याप पूर्ण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच अत्यंत निर्धाराने कनिका यांनी सैन्य भरतीची पूर्व परीक्षा पास करून एक पाऊल सैन्यातील भरतीकडे टाकलं आहे. सुनेवर सासू आणि सासरे यांना कौस्तुभसारखाच अभिमान आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. आपल्या पतीच्या हौतात्म्यानंतर आपण देखील आपले जीवन सैन्याला देण्याचा कनिका राणे यांनी निर्णय घेतला होता. अखेर शहीद कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याला 1 वर्षही पूर्ण झालं नसताना कनिका राणे यांनी सैन्यअधिकारी पदासाठी दिलेली परीक्षा पास केली. ऑक्टोबर महिन्यात त्या चेन्नईला सैन्य प्रशिक्षणासाठी जाणार आहेत .

मिरा रोडच्या शीतल नगर परिसरात राहणारे मेजर कौस्तुभ राणे 6 ऑगस्ट 2018 ला शहीद झाले होते.

आपल्या सहा वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती.

राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली.

राणे हे आपल्या घरातील एकुलते एक असल्या कारणांमुळे  कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती.

परंतु आपले पती कौस्तुभ राणे शहीद झाल्यानंतर पूर्ण घराचा भार उचलण्याचा निर्धार त्यांच्या पत्नी कनिका राणे यांनी केला होता.

सैन्याच्या अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली असून ती साहसीक कार्य पूर्ण केली.

शहीद मेजर कौस्तुभ राणेची पत्नी कनिका कौस्तुभ राणेंनी ज्या प्रकारे कठीण परिस्थितीत मध्ये सैन्यात जाण्याचं निर्णय घेतला आणि परीक्षा पास केली, ते अभिमानास्पद आहे. सासरे प्रकाश राणे, सासू ज्योती प्रकाश राणेला मुलगा कौस्तुभ राणे सारखेच सून कनिका कौस्तुभ राणेवर अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *