पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मार्च सोमवारी रात्री ९ च्या दरम्यान एक मोठी घोषणा केली. येत्या रविवारपासून म्हणजेच ९ मार्चपासून मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
काय म्हणाले मोदी ?
या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब हे सोशल मीडिया अकाउंट्स सोडून देण्याचा विचार असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार एक्टीव्ह असतात. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या नेत्यांपैकी नरेंद्र मोदी हे एक आहेत.
नरेंद्र मोदींचे ट्विटरवर ५३.३ दशलक्ष, इंस्टाग्रामवर ३५.२ दशलक्ष तर फेसबुकवर १४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
त्यामुळे आता नरेंद्र मोदी येत्या रविवारी ९ मार्चला सोशल मीडिया संदर्भात काय निर्णय घेतात, याकडे साऱ्या देशाचे लक्ष असणार आहे.