Jaimaharashtra news

फराह खानच्या आगमनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेट वर धमाल

आपण वेगवेगळ्या प्रकारचे हसवणारे कार्यक्रम पाहतोच त्यांच्या पैकीच चला हवा येऊ द्या हा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा चाहता वर्ग मोठा आहे. या शोमधील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.या शो मध्ये वेगवेगळ्या सिलिब्रिटींना आमंत्रित केले जाते . नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने एंट्री केली. डॉ. निलेश साबळे यांच्या उत्कृष्ट निवेदन शैलीमुळे या शो मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होते. डॉ. साबळे आणि त्यांच्या अवलिया टीमने आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खानने ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये हजेरी लावली.फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’ च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला.’चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांचे जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्वांना हसू अनावर झालं.फराह खान सोबत भाऊ कदमने बॉलीवूडच्या आयटम सॉंगवर ठेका धरला . फराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आली होती . या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही.’पुढे फराह म्हणाली, ‘मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं.” असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.’

 

Exit mobile version