Mon. Jul 13th, 2020

कामगाराने मालकाच्या पत्नी आणि चिमुकलीची केली हत्या

  रागाच्या भरात नोकराने माय लेकीच्या हत्या केल्याची धक्कादायक घटना काल नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे घडली.

Labeled remains of person lying in mortuary

नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे पाणीपुरी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने आपल्याच मालकाच्या पत्नीला आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालक आणि या कामगारामध्ये वाद झाला होता. या वादाच्या रागातून हत्या केल्याचे समजते आहे. प्रियांका शाहू (25) आणि अंशुल (4) असे मृतांचे नाव असून रवी पटेल असे आरोपीचे नाव आहे.

 नेमकं काय घडलं ?

नागपूरमध्ये प्रियांका शाहू यांच्या पतीचा पाणी पुरीचे दुकान आहे.

रवी पटेल त्यांच्या पाणी पुरीच्या दुकानावर काम करतो.

मालक आणि रवी यांच्यामध्ये वाद झाला होता.

मालकाने रवीला आपल्या घरी काही सामान घेण्यासाठी पाठवले असताना हत्या केल्याचे समजते आहे.

संध्याकाळी दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांना समजताच घराकडे धाव घेतली.

त्यावेळी रक्ताच्या थारोेळ्यात प्रियांका आणि चार वर्षांचा चिमुकली अंशुल यांचा मृतदेह आढळला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पतीची चौकशी केल्यावर रवीचे नाव समोर आले.

पोलिसांनी रवीला अटक केली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *