Wed. Feb 26th, 2020

मनाविरुद्ध बदलीचा राग, अधिकाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीचा स्प्रे!

Boy spraying insect with fly spray

मनाविरुद्ध बदली केल्याचा निषेध म्हणून महिला वाहकाकडून विभाग नियंत्रकाच्या डोळ्यावर मिरची पाण्याच्या स्प्रे उडविल्याची घटना जळगाव बस स्थानकात विभाग नियंत्रकाच्या केबिनमध्ये घडल्याने मोठी खळबळ उडाली.

काय घडलं नेमकं?

धुळे बस आगारात सुनीता लोहार या कार्यरत आहेत याच विभागात मागील वर्षी राजेंद्र देवरे हे देखील विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत होते.

या कार्यकाळात सुनीता लोहार यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांची बदली अक्कलकुवा येथे करण्यात आली.

मात्र या बदलीला विरोध असल्याने सुनीता लोहार यांनी आपली मूळ ठिकाणीच बदलीची मागणी कायम ठेवली होती.

ही मागणी मान्य होत नसल्याने त्यांचे राजेंद्र देवरे यांच्याशी सातत्याने खटके उडत होते.

यामध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे

या घटनेचा पार्श्वभूमीवर आपल्या बदलीसाठी राजेंद्र देवरे यांच्या मुळेच अडचण होत असल्याचा रागातून सुनीता लोहार या आज जळगाव बस स्थानक आगारात आल्या होत्या त्यांनी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यावर मिरची पाणी असलेल्या स्प्रे त्यांच्या डोळ्यावर उडवून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमध्ये मोठा गोंधळ उडाल्याने कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी महिला वाहकास ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *