Mon. Mar 30th, 2020

औरंगाबादमध्ये घरात घुसून बारचालकाने महिलेला जाळलं

हिंगणघाट येथे भररस्त्यात शिक्षिकेला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर औरंगाबादमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

औरंगाबादच्या सिल्लोड येथे बिअर बारवाल्याने  घरात घुसून एका 50 वर्षीय महिलेला जिवंत जाळलं.

पीडित महिला रविवारी घरात एकटी असताना रात्री 11 वाजता बिअर बारचालक संतोष मोहिते तिच्या घरी घुसला.

त्याला अवेळी घरात आलेलं पाहून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं.

या घटनेत महिला 95% भाजली आहे.

पोलिसांनी संतोष मोहितेला अटक केलं आहे.

मुंबईतही तरुणीवर हल्ला

आता मुंबईमध्ये 26 वर्षीय तरुणीवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला केल्याचा भीषण प्रकार घडला आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून आरोपीने तरुणीवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला केला. मुंबईच्या मिरारोड येथे काशीमिरा परिसरात हा प्रकार घडला. पीडित तरुणी घरी जात असताना आरोपी तिचा मोटरसायकलवरून पाठलाग करत होता. त्याने पीडितेवर ज्वलनशील पदार्थ फेकला. मात्र पीडितेने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी पळून गेला.

पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी ताबडतोब आरोपीचा शोध गेऊन त्याला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *