Fri. Aug 14th, 2020

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टी 20 वर्ल्ड कपसाठी महिला टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.

निवडसमितीने टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीम इंडिया जाहीर केली आहे. यामध्ये बंगालच्या रिचा घोषला संधी दिली आहे.

या टी-20 वर्ल्ड कपची स्पर्धेची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होत आहे. तर 8 मार्चला वर्ल्ड कपची फायनल खेळली जाणार आहे.

वर्ल्ड कपमधील पहिली मॅच टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणार आहे.

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया, 21 फेब्रुवारी, सिडनी

टीम इंडिया विरुद्ध क्वालिफायर-1, 24 फेब्रुवारी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 27 फेब्रुवारी, मेलबर्न

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 29 फेब्रुवारी, मेलबर्न

तसेच वर्ल्ड कपमधील दोन्ही सेमीफायनल मॅचेस एकाच दिवशी होणार आहेत.

या सेमीफायनल मॅच 5 मार्चला सिडनीत खेळल्या जाणार आहेत.

सेमीफायनल 1, सिडनी
सेमीफायनल 2, सिडनी

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, हर्लीन देओल, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्रकर, पूनम यादव, राधा यादव, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपआधी त्रिकोणी मालिका खेळणार आहे.

या त्रिकोणी सीरिजमध्ये टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा तीन टीमचा समावेश आहे.

या त्रिकोणी सीरिजसाठी 16 जणांच्या सदस्यांची घोषणा केली आहे.

या सीरिजला 31 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

त्रिकोणी सीरिजसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्रकर आणि अरुंधती रेड्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *