Mon. Aug 15th, 2022

चिखलदऱ्यातील स्कायवॉकच्या कामाला गती मिळणार

विदर्भातील मेळघाट भागात चिखलदरा येथे येणा ऱ्या पर्यटकांचे लवकरच त्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष आकर्षण असणार आहे.
विदर्भातील चिखलदरा या हिल-स्टेशनमध्ये ७०७ मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. जगातील तिसरा आणि देशातील पहिला स्काय वॉक हा मेळघाटातील चिखलदरा येथे तयार होतोय. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) .३ ३४.३४ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प विकसित करीत असून तो लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.या प्रकल्पाचा मध्यम भाग १०० मीटर ग्लास फ्लोर असेल तसेच या ७०७ मीटर लांबीच्या पुलाचा उर्वरित भाग एअर पास-इन सक्षम करण्यासाठी चेकर स्टील प्लेट्ससह विकसित केला जाईल. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंना चेनलिंक कुंपण असेल.या योजनेमुळे पर्यटकांना सुविधा मिळतील.

या स्काय वॉकचे ७०% कामकाज झाले असताना वनविभागाच्या परवानगीमुळे या प्रकल्पाचे काम संत गतीने होतेय. या कामाला गती यावी याकरिता अधिकाऱ्यांसह खासदार नवनीत राणा यांनी नागपूर येथे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे..राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे या प्रकल्पाचे काम थांबले असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हंटल आहे..या बाबत सकारात्मक राहून राज्य शासनाकडे नंतर केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच या प्रकल्पाच काम पूर्णत्वास येईल आणि स्कायवॉकचा आनंद पर्यटकांना लुटता येईल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय..

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.