खुशखबर! ‘हे’ मोबाइल्स होणार आणखी स्वस्त!

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहत तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतात MI A2 आणि Redmi Note 6 Pro च्या किंमती कमी झाल्या आहेत. बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन शाओमीने भारतामध्ये MI A2 आणि Redmi Note 6 Pro या दोन स्मार्टफोन्सची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट आणि इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
MI A2
शाओमी Mi A2 आता 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
2000 रुपयांनी या मोबाईलची किंमत कमी करण्यात आली आहे.
Mi A2 या मोबाईलची स्क्रीन 5.99-इंच आहे.
या मोबाईलमध्ये ऑक्टा कोर क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आलाय.
फोटोग्राफीसाठी रियर 20 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत.
याचबरोबर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे.
MI A2 मोबाईलच्या 6GB रॅम आणि 128 स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत कमी केली नसून तो मुळ किंमतीत उपलब्ध आहे.
Redmi Note 6 Pro
Redmi Note 6 Pro हा मोबाइल 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
2000 रुपयांनी या मोबाईलची किंमत कमी करण्यात आली आहे.
Redmi Note 6 Pro मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे.तर 4000mAh बॅटरी आहे.
या मोबाईलमध्ये 19:9 रेश्यो आणि 1080 x 2280 पिक्सल रिजोल्यूशन असून 6.26-इंच फुल HD + डिस्प्ले आहे.
ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 636 प्रोसेसर देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत.
याबरोबर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असलेले असे दोन कॅमेरे आहेत.
Redmi Note 6 Pro मोबाईलच्या 6GB रैम और 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत कमी केली नसून तो मूळ किंमतीत उपलब्ध आहे.