Wed. Oct 27th, 2021

Pubgला टक्कर देण्यासाठी Xiomi चा नवा Survival Game

सध्या युवक आणि मुलांमध्ये PubG गेमला सर्वाधिक पसंती आहे. मात्र आता PubG ला टक्कर देण्यासाठी Xiomi ने  नविन गेम लॉन्च केला आहे. Xiomi चा Survival गेम हा PubGसारखाच आहे.

काय आहे Survival game?

Survival Gameही PubG प्रमाणेच  ही युद्धावर आधारित आहे.

या गेममध्ये जिवंत राहण्यासाठी अन्य खेळाडूंना मारणं गरजेचं असतं.

हा गेम 185 MB sizeचा आहे.

Pubgची हुबेहुब नक्कल केल्याचं Survival Gameमध्ये पाहायला मिळतंय.

गेमची सुरुवात पॅराशूटने उडी मारण्यापासून होते

अखेरपर्यंत जिवंत राहणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित करण्यात येतं.

हे ही वाचा- ‘पबजी चॅलेंज टूर्नामेंट’- जिंकणाऱ्याला 1 कोटीपर्यंत बक्षिस

PubG चं नवं update

PubG ने नुकतीच 0.10.5 update ची घोषणा केली आहे. या अपडेटनंतर खेळाडुनां स्टेबल विकेंडी मॅप, Zombie Mode आणि Night Mode यासारख्या featuresवर शस्त्रं मिळतील. या गेमला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु, तो आतापर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला नव्हता. Xiomiचा Survival Game एमआयच्या स्टोरवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ Xiomi आणि रेडमीच्या ग्राहकांना download करण्याची संधी मिळणार  आहे.

हे ही वाचा- वेड्यासारखा खेळला ‘पबजी’ आणि खरंच झाला वेडा!

जम्मू-काश्मीरमध्ये 10वी, 12 वीच्या परीक्षा जवळ आल्याने PubG वर बंदी आणावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली आहे. आता Xiomiच्या या Survival game तरूण आणि मुलाच्या पसंतीस उतरतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *