हिज्बुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का; टॉप कमांडर यासिन इट्टूचा खात्मा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दक्षिण काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर यासिन इट्टू उर्फ मेहमूद गझनवीला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.
गझनवीसह एकूण तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले. यामुळे हिज्बुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का बसला.
दुर्दैवाने दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या दोन जवानांचा वीरमरण आले.
यासीन इट्टू हा बुरहान वाणीचा जवळचा मानला जायचा. त्यामुळे त्याचा खात्मा भारतीय जवानांसाठी मोठ यश मानलं जात आहे.