Mon. Apr 19th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 95 नव्याने पॉझेटिव्ह ; 73 जण बरे तर एकाचा मृत्यु

जिल्ह्यात 24 तासात 95 जण नव्याने पॉझेटिव्ह…

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात 24 तासात 95 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 73 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 1612 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 95 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1517 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 446 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11330 झाली आहे.

24 तासात 73 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10515 आहे. तर जिल्ह्यात एकूण 369 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 109461 नमुने पाठविले असून यापैकी 108625 प्राप्त तर 836 अप्राप्त आहेत. तसेच 97295 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *