Sat. May 15th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 51 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझेटिव्ह दोघांचा मृत्यू

24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह…

यवतमाळ, दि. 1 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 51 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 80 वर्षीय आणि पांढरकवडा शहरातील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 470 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 433 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 488 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11556 झाली आहे.

24 तासात 51 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10695 आहे. तर जिल्ह्यात एकूण 373 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 111802 नमुने पाठविले असून यापैकी 111438 प्राप्त तर 364 अप्राप्त आहेत. तसेच 99882 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *