Mon. Mar 1st, 2021

जिल्ह्यात 56 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह

24 तासात जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझिटिव्ह…

यवतमाळ, दि. 7 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर 24 तासात जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 304 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 275 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत 313 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11749 झाली आहे. 24 तासात 56जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11060 आहे. तर जिल्ह्यात एकूण 376 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 114730 नमुने पाठविले असून यापैकी 114208 प्राप्त तर 522 अप्राप्त आहेत. तसेच 102459 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *