Mon. Mar 8th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 76 जणांची कोरोनावर मात तर 49 नव्याने पॉझेटिव्ह,एकाचा मृत्यु

24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 10 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 97 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे.

मृतकामध्ये वणी तालुक्यातील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 602 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 553 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 282 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10589 झाली आहे.

आज 76 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9653 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95467 नमुने पाठविले असून यापैकी 95205 प्राप्त तर 262 अप्राप्त आहेत. तसेच 84616 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *