Sun. Mar 7th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 71 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 71 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 8) एकूण 349 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 71 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 278 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 423 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13098 झाली आहे. 24 तासात 57 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12268 आहे. तर जिल्ह्यात एकूण 407 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 128150 नमुने पाठविले असून यापैकी 127556 प्राप्त तर 594 अप्राप्त आहेत. तसेच 114458 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *