हत्तींच्या मदतीने होणार नरभक्षक वाघिणीची शिकार?
सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर वन विभागाने नरभक्षक वाघिणीला ठार करण्यासाठी व्यापक मोहीम सुरु झाली आहे.
मंगळवारी पांढरकवडा जंगलात वन विभागाने कॅम्प लावले होते.
सकाळी वन विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन वाघिणीला ठार करण्याचे नियोजन केले आहे.
सावरखेडा आणि लोणी या भागात वनअधिकाऱ्यांनी 2 वेगवेगळे कॅम्प लावले आहेत. तसेच 2 वेगवेगळ्या टीम सकाळी 10 पासून या वाघिणीच्या शोधात रवाना झाली आहे.
मात्र अजूनपर्यंत या नरभक्षक वाघिणीचं निश्चित ठिकाण मिळू शकलेलं नाही.
या ऑपरेशनमध्ये 2 हत्तींची मदतही घेण्यात आली आहे. हे हत्ती मध्य प्रदेशवरुन मागवण्यात आले आहेत.
तसेच हैद्रबादचा शूटर नवाब शफत अली याच्यावर या वाघीणीला शूट करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
नरभक्षक वाघिणीचा शोध सुरू
- नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाची जोरदार मोहीम
- हैद्रबादचा शूटर नवाब शफत अली याच्यावर वाघीणीला शूट करण्याची जबाबदारी
- नवाब याच्याकडे 2 जीप, हेल्पर टिमचा ताफा
- थर्मल सेन्सर ड्रोनद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध
- 300 हेक्टर जंगलातील झुडुपांच्या कापणीला सुरुवात
- अमरावती इथ शीघ्र कृती दल
- नवेगाव, नागजिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष पथक
- व्याघ्र संरक्षण दलातील जवानांची तुकडी तैनात
- 60 पेक्षा अधिक कर्मचारी वाहनासह वाघिणीच्या शोधात