Mon. Jan 25th, 2021

सावधान! ‘या’ अॅप्समुळे तुमचं Whatsapp होणार बंद

जगभरात संवादाचं प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अॅप म्हणजे Whatsapp. जगभरात whatsapp वापरणारे करोडो युजर्स आहेत.

मात्र whatsapp लवकरच आपल्या काही युजर्सचं अकाउंट्स बंद करण्यार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

कंपनीने या विषयी एक सविस्तर ब्लॉग लिहीलं आहे.

या ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, जे युजर्स GB whatsapp किंवा whatsappप्लस सारखे अॅप वापरतात त्यांची अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

काही डेव्हलपर्स whatsappच्या ओरिजिनल अॅपला एडिट करुन ही फेक अॅप बनवत आहेत, अशी माहिती या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त whatsappने त्यांच्या फेक पेजवर एका लेखच्या माध्यमातून युजर्सना सांगितलं आहे, की जर तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये Temporarily banned चा मेसेज दिसला तर घाबरण्याचं कारण नाही.

या मेसेजचा अर्थ हा आहे, की तुम्ही आतापर्यंत whatsappचा फेक अॅप वापरत होतात.’

व्हॉट्सअॅपने पुढे सांगितले, की कंपनी या दोन्ही फेक अॅप्सच्या सिक्युरिटीची गॅरन्टी घेत नाही.

https://www.whatsapp.com/android या लिंकवरुन व्हॉट्सअॅपचं ओरिजीनल अॅप युजरला डाउनलोड करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *