Tue. Oct 26th, 2021

मुंबई लोकलसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पास मिळणार

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या मुंबईकरांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास खुला करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन पास, क्यूआर कोड आदींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने संपूर्ण नियोजन केले आहे. सर्वसामान्यांना लोकल पास उपलब्ध करताना अडचणी येणार नाहीत यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारच्या सहाय्याने येत्या दोन दिवसांत अ‍ॅप तयार केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. ६५ रेल्वे स्थानकांवर रेल्वे तिकीट आणि पाससाठी क्यूआर कोड मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचा राज्य सरकार आणि रेल्वेसोबत समन्वय सुरू आहे.

कधी? कुठे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ६५ रेल्वे स्थानकांवर पास मिळतील
मध्य, पश्चिम व हार्बर तिन्ही मार्गावरील स्थानकांचा समावेश
६५ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष असतील
सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत सलग ही प्रक्रिया सुरू राहील
आठवड्यातील सर्व दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार
आसपासच्या शहरांतील एकूण १०९ रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *