Thu. Jan 20th, 2022

पतीच्या गर्लफ्रेंडवर पत्नीचा लैंगिक अत्याचार, गुप्तांगात टाकली मिरची पुड

पतीच्या अनैतिक संबंधांमुळे (Extra-marital affair) संतापलेल्या पत्नीने त्याच्या गर्लफ्रेंडशी अत्यंत भयानक कृत्य केल्याची घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडली आहे. आपल्या पतीच्या 22 वर्षीय गर्लफ्रेंडचे केवळ कपडेच तिने फाडले नाहीत, तर तिच्या गुप्तांगात मिरचीची पुड टाकण्याचा अमानुष प्रकारही तिने केलाय.

काय होतं प्रकरण?

22 वर्षीय पीडित तरुणी अहमदाबादमधील एका कापडाच्या दुकानात काम करत होती.

तिथेच काम करणाऱ्या गिरीश नामक व्यक्तीशी तिचे प्रेम संबंध होते.

गिरीश मात्र विवाहीत होता. त्याचे या मुलीशी विवाहबाह्य संबंध होते.

सुमारे 2 वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर पीडित मुलीने गिरीशसी ब्रेकअप केला आणि नोकरीही सोडली.

पीडित तरुणी दुसरीकडे नोकरी करत होती.

मात्र गिरीश वारंवार तिला फोन करून भेटण्याची मागणी करत होता.

या गोष्टीची माहिती गिरीशची पत्नी जानू हिला लागल्यावर तिला खूप राग आला.

आपल्या नवऱ्याशी विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या मुलीला धडा शिकवण्यासाठी तिने आपल्या 2 मैत्रिणींची मदत घेतली.

एक दिवस जानूने आपल्या मैत्रिणींच्या मदतीने पीडित तरुणीला kidnap केलं.

तिचं अपहरण करून एका निर्जन ठिकाणी नेलं.

तिथे पीडित तरुणीचे कपडे फाडून टाकले. तिच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकली.

या वेदनांनी कळवळून विव्हळणाऱ्या पीडित मुलीचा व्हिडिओदेखील जानूने शूट केला. तसंच आपल्या पतीशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न केला, तर तुझ्यावर acid हल्ला करू, अशी भीषण धमकीही दिली.

यानंतर आपल्या पतीने गर्लफ्रेंडवर पैसे उडवल्याच्या संशयामुळे या पीडितेकडे तिने 50 लाख रुपयांची मागणी केली.

हल्ल्यानंतर तिघी मैत्रिणी पीडितेला तसंच सोडून पळून गेल्या.

पीडित तरुणीने पोलिसांत या प्रकाराची तक्रार दाखल केल्यावर जानू आणि तिच्या दोन्ही मैत्रिणींना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *