Tue. Apr 20th, 2021

कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 33 वर पोहचली आहे. तर देशात हाच आकडा शंभरी पार गेला आहे. कोरोनामुळे देशात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या अफवांना मोठ्या प्रमाणात उत आला आहे.कोरोनाबाबत कोणत्याही अफवा न पसरवण्याचं तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान कोरोना विषाणूवरुन अफवा पसरवणाऱ्याविरोधात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्यात पहिल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नक्की काय घडलं ?

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये 3 परदेशी नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती या तरुणानं दिली होती. या तरुणाने या संदर्भातील माहिती विभागीय आयुक्त यांना दिली. हेल्पलाईनच्या मदतीने ही माहिती विभागीय आयुक्त यांना दिली.

कोरोना विषाणूमुळे MPSC च्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित

दिलेल्या माहितीची चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलं. यानंतर स्वतः विभागीय आयुक्तांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत अफवा पसरवण्याविरोधात गुन्हा नोदं करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

मुंबईत जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत 31 मार्चपर्यंत जमावबंदी असणार आहे. महत्वाचे कार्यक्रम तसेच एमपीएससीच्या परीक्षादेखील 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *