Wed. Mar 3rd, 2021

झरीन खानने कतरिनावर केला आरोप

‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे झरीन खान हीने नुकताच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. यात तिने काही गोष्टीचा खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये तिला तिची तुलाना बऱ्याच वेळा अभिनेत्री कतरिना कैफशी करण्यात आली. त्यावर तिने उत्तर देत कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला असा आरोप करत म्हटलं , ‘प्रत्येक व्यक्ती हा इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी येत असतो. मी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यासाठी गेली ११ वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र आजपर्यंत लोकं मला मी कतरिनासारखी दिसते असं म्हणतात. मी तिच्यासारखी दिसत असल्यामुळे कोणताही चित्रपट निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार होत नाही. कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला’असं झरीन म्हटलं.

झरीने ‘हाऊसफूल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अकसर २’, ‘रेडी’अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. झरीनने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाहिजे तशी तिला प्रसिद्धी मिळाली नाही. आता लवकरच तिचा आणखी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *