Thu. Nov 26th, 2020

आज तुमची सावली नाहीशी होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र सोमवारी ही सावली आपली साथ सोडणार आहे.

 

आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव आज दुपारी मुंबईकरांना घेता येणार आहे.

 

दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.

 

माणसाची सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत झिरो शॅडो डे असे म्हटले जाते. वर्षांतून दोन वेळा आपल्याला हा अनुभव घेता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *