Thu. Apr 22nd, 2021

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमचा बॉलिवूडमधून संन्यास!

दंगलमधून आपल्या दमदार अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधणारी झायरा वसीमने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय. तिने तशी फेसबूक पोस्ट करत सांगितलं आहे.

दंगलमधून आपल्या दमदार अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधणारी झायरा वसीमने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय. तिने तशी फेसबूक पोस्ट करत सांगितलं आहे. मी इथे येण्यासाठी बनलेली नाही असं म्हणतं. तिने बॉलिवूड सोडले आहे. दंगल, सिक्रेट सुपरस्टारसारख्या सिनेमात झायराने काम केले आहे.

काय म्हणते झायरा वसीम?

दंगलमधून आपल्या दमदार अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधणारी झायरा वसीमने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दंगल, सिक्रेट सुपरस्टारसारख्या सिनेमात झायराने अभिनय केला आहे.

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर याबद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे.

पाच वर्षांपूर्वी झायराने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. मला इथे खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

बॉलिवूडचा हा प्रवास खूप दमवणार आहे मात्र मला मिळालेल्या ही ओळखीमुळे मी आनंदी नाहीये.

 

जरी मी इथे माझ्या स्थिर असले तरी मी इथे यासाठी बनले नाही असं मला वाटतं.

या पाच वर्षात मी स्वतःशीच लढत आलेय आणि या छोट्याच्या आयुष्यात मी इतकी मोठी लढाई मी लढू शकत नाही.

त्यामुळे मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय.खूप विचार करुन हा निर्णय घेतलाय.असं झायरानं पोस्ट केलं आहे.

आगामी काळात झायराचा स्काय इज पिंक हा प्रियांका चोप्रा सोबतचा सिनेमा रिलीज होणार आहे.

मात्र तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *